यात शिवसेने कडून सचिन खैरे, कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, राजेंद्र जंजाळ, सुरेखा सानप, भाजपाकडून राजू शिंदे, तर एमआयएम कडून नासिर सिद्दिकी, सय्यदा बेगम आदींची वर्णी लागलेली आहे. आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीचा सभापती कोण ? याकडे लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया पडण्याची शक्यता असून, यंदाचे सभापतीपद हे भाजपच्या वाट्याला येणार असल्याने सदस्य निवड होताच अनेकांच्या नावाची चर्चा मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे. यात गजानन बारवाल, पुनम बमणे, व नुकतीच सदस्य म्हणून निवड झालेले राजू शिंदे आदींचा सामावेश आहे. बमणे हे सभापती पदाचे दावेदार होते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीचे उमेदवार खासदार खैरे यांचा प्रचार केला नसल्याची चर्चा सध्या असल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे. या यादीत सध्या शिंदे यांचे नाव आघाडीवर असून, तेच सभापती होणार असल्याची चर्चा सध्या मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे.